मुंबईत केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टरची आत्महत्या

केईएम रुग्णालयात धक्कादायक घटना पुढे आली आहे.  

Updated: Nov 16, 2019, 04:39 PM IST
मुंबईत केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टरची आत्महत्या

मुंबई : येथील केईएम रुग्णालयात धक्कादायक घटना पुढे आली आहे. निवासी डॉ. प्रणय जैस्वाल (२८) यांनी आत्महत्या केली. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत भोईवाडा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

डॉ. प्रणय जैस्वाल हे केईएम रुग्णालयातून नुकतीच पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांना सुवर्ण पदक (Gold medal) मिळाले होते. ते मूळचे अमरावतीचे राहणारे होते. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अधिक तपास भोईवाडा पोलिसांकडून सुरु आहे.