'अमृता ताई, अशीच आवड जोपासा...'; रोहित पवारांची प्रतिक्रिया

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यावर ट्विट 

Updated: Mar 9, 2021, 10:54 AM IST
'अमृता ताई, अशीच आवड जोपासा...'; रोहित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)यांना गाण्याचा छंद आहे. आपली नोकरी सांभाळत त्यांनी आपली गाण्याची आवड जोपासली आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. कधी याच गाण्यांमुळे ट्रोल झालेल्या अमृता फडणवीसांना रोहित पवारांनी (Rohit Pawar on Amruta Fadnavis New Song)  कौतुकाची दाद दिली आहे. 

अमृता फडणवीसांचं नवं गाणं 

अमृता फडणवीस यांनी महिला दिनाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे त्यांनी महिला दिनाच्या दिवशी शेअर केले आहे. या गाण्याचा गीतकार डॉ. स्वप्ना असून गाण्याला चाल रोहन रोहनने दिली आहे. (अमृता फडणवीस यांचा नवा पारंपरिक लूक व्हायरल) 

रोहित पवारांकडून कौतुक 

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्याचं आणि त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,'काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण @fadnavis_amruta  ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!'

ट्रोलर्सला दिला होता इशारा 

या गाण्याची पोस्ट शेअर करण्यापूर्वी त्यांनी ट्रोलर्स इशारा दिला होता. आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या