Sachin Vaze bail : सचिन वाझे यांना जामीन मंजूर, पण......

मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) वाझेला मनी लाँड्रिंग (Money laundering case) प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. 

Updated: Nov 18, 2022, 04:22 PM IST
Sachin Vaze bail : सचिन वाझे यांना जामीन मंजूर, पण......  title=
sachin vaze bail

मुंबई :  या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Vaze bail) मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) वाझेला मनी लाँड्रिंग (Money laundering case) प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र वाझेला जामीन मंजूर झाला असला तरी त्यांना इतर प्रकरणांमुळे जेलमधून सुटका होणार नाहीये. ईडीने वाझेला जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र न्यायलयाने हा विरोध फेटाळला आणि वाझेला जामीन दिला आहे. (sacked police officer sachin vaze granted bail by mumbai sessions court in money laundering case)

वाझेच्या जामीनावर 15 नोव्हेंबरला सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानुसार आज 18 नोव्हेंबरला निकाल लागणार होता. ईडीने वाझेवर गुन्हा दाखल केला होता. वाझेने सीआरपीसी (Crpc) कलम 88 नुसार जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. मात्र ईडीने या जामीनासाठी विरोध केला. मात्र आज अखेर न्यायालयाने वाझेच्या बाजूने निर्णय देत त्याला मोठा दिलासा दिलाय.

कोण आहेत सचिन वाझे? (Who Is Sachin Vaze)

सचिन वाझे हे 1990 च्या बॅचमधील पीएसआय आहेत. वाझेंच्या नावावर 63 एन्काउंटर आहेत. बॉम्ब स्फोट आरोपी ख्वाजा युनूसचा मृत्युमुळे वादात अडकले. युनूसचा 2004 मध्ये कोठडीत मृत्यू झाला.  त्यामुळे वाझे यांना निलंबित करण्यात आलं.  सरकारने वाझेंचा 2007 मध्ये नोकरीचा राजनीमा नाकारला. त्यानंतर वाझे यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. वाझे जून 2020 मध्ये पुन्हा पोलीस सेवेत रुजु झाले.