होय मी भंगारवाल्याची मुलगी!, भाजप नेत्याला मलिक यांच्या मुलीचे प्रत्युत्तर

Mumbai Drugs Case : नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बर्थ सर्टिफिकेटवरून आता वाद टोकाला गेला आहे. भाजपनेही या वादात उडी घेतली आहे. दरम्यान, भाजप नेते मोहित कम्बोज यांच्या 100 कोटींच्या खटल्यावर उत्तर देताना होय मी भंगारवाला आहे, असे म्हटले आहे.

Updated: Oct 29, 2021, 02:16 PM IST
होय मी भंगारवाल्याची मुलगी!, भाजप नेत्याला मलिक यांच्या मुलीचे प्रत्युत्तर title=

मुंबई : Mumbai Drugs Case : ड्रग्स प्रकरणाचा तपास करणाऱ्या समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर हे प्रकरण गंभीर झाले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बर्थ सर्टिफिकेटवरून आता वाद टोकाला गेला आहे. भाजपनेही या वादात उडी घेतली आहे. दरम्यान, भाजप नेते मोहित कम्बोज यांच्या 100 कोटींच्या खटल्यावर उत्तर देताना होय मी भंगारवाला आहे, असे म्हटले आहे.

यावेळी त्यांनी नवाब मलिक या शहरात जेवढे भंगार आहेत, त्यांचे एकएक नट बोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे आणि यांचे पाणी केल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा भाजप नेते मोहित कम्बोज यांनी दिला होता. त्याला उत्तर मलिक यांच्या मुलीने दिले आहे.

दरम्यान नवाब मलिक यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची मुलगी सना मलिक (Sana Malik-Shaikh) हिने ही ट्विट केले आहे. 'होय मी भंगारवाल्याची मुलगी! मला अभिमान आहे. मी मराठी मुलगी', असे ट्वीट करत तिने आपल्या वडिलांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी #NawabMalikMyHero हा हॅशटॅगदेखील वापरला आहे.