Sanjay Raut : 'मी लढणार, महाराष्ट्र कमजोर नाही' ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

 'बाळासाहेबांचे सर्व लढण्याचे गुण आमच्यात आले आहेत. मी डरपोक नाही'

Updated: Jul 31, 2022, 05:34 PM IST
Sanjay Raut : 'मी लढणार, महाराष्ट्र कमजोर नाही' ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया title=

ED Detain Sanjay Raut : ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांना ताब्यात घेतलं आहे. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांची आज सकाळी 7.30 वाजल्यापासून त्यांच्या भांडूपमधल्या घरी चौकशी सुरु होती.

त्यानंतर संजय राऊत यांना घेऊन ईडी अधिकारी फोर्ट इथल्या ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केलं आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे. 
आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते..
जो कभी  हार नहीं मानता!
झुकेंगे नही!
जय महाराष्ट्र

संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
जी काय कारवाई व्हायची आहे ती होऊ द्या, राजकीय सूडाने सर्व खेळ सुरु आहे. माझा पक्ष माझ्या पाठिशी आहे. उद्धव ठाकरे माझ्या पाठिशी आहे, शिवसैनिक माझ्या पाठिशी आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  

संजय राऊतला महाराष्ट्र ओळखोत ते शिवसेनेमुळे, संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही निधड्या छातीने उभा रहातो आणि लढतो. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल. भाजपच्या विरोधकांच्याविरुद्ध महाराष्ट्रात ज्या कारवाया सुरु आहेत. आमच्या सारखेही काही लोकं आहेत जे कारवाईला सामोरे जातायत आणि लढाई लढतात.

या अशा कारवाईच्या भीतीने अनेक लोकं पक्ष सोडून जातात, शरणागती पत्करात, संजय राऊत त्यातले नाहीत. मरेन पण झुकणार नाही शिवसेना सोडणार नाही. 

कोणतीही कागदपत्र माझ्याकडे सापडलेली नाहीत. पत्राचाळ घोटाळा म्हणतात, तो कोणता पत्रा गंजलेला आही की स्टीलचा तो मला माहित नाही, ती चाळ कुठे आहे मला माहित नाही. 

तरीही ठरलेलं आहे की शिवसेना मोडायची, तोडायची माझा आवाज बंद करायचा, उद्धव ठाकरे यांना कमजोर करायचं त्यासाठी ही कारवाई आहे, पण अशाने शिवसेना आणि महाराष्ट्र कमजोर होणार नाही, उलट आजच्या कारवाईतून महाराष्ट्राला लढण्याचं बळ मिळत असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे. 

माझ्यावर सूडाने, बदल्याच्या भावनेने, शिवसेनेला संपवण्यासाठी, उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी माझ्यावर कारवाई केली जात आहे. बाळासाहेबांचा जवळचा सहकारी होतो मी, त्यामुळे बाळासाहेबांचे सर्व लढण्याचे गुण आमच्यात आले आहेत. मी डरपोक नाही, कर नाही त्याला डर कशाला, आणि डरून आम्ही पक्षही सोडणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.