Sanjay Raut on BJP : 2024 ला देशात सत्तापरिवर्तन होणार असून, महाराष्ट्रात लोकसभेच्या 40 जागा जिंकू असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नितीश कुमार यांच्याशी अद्याप त्याबाबत चर्चा झालेली नाही. विरोधी पक्षाने एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात आणि काम करावे. निवडणुका जिंकायच्या आहेत. हे महत्त्वाचे आहे, असे राऊत म्हणाले.
भाजपविरोधात सर्व विरोधक 2024 ला एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. यासाठी काँग्रेस नेते विरोधी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. कालच पवार आणि नितीश कुमार यांची खरगे आणि राहुल गांधी यांनी भेट घेतली. आता वेणुगोपाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. देशात ही परिवर्तनाची लाट आहे आणि 2024 ला सत्ता परिवर्तन होणार असून, देशात सुरु असलेली हुकूमशाही मोडण्यासाठी विरोधक एकत्र येत असल्याचं राऊतांनी म्हटले आहे.
प्रादेशिक पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष सर्व एकत्र येणे याला सुरुवात झालेली आहे ही आशादायी गोष्ट आहे. महाराष्ट्रात आम्ही 48 पैकी 40 जागा जिंकू असं वातावरण आहे. सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे महासचिव येऊन उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत, असे यावेळी राऊत म्हणाले.
काँग्रेससोबत चर्चा आहे. काँग्रेस महासचिव यांच्या भेटीत भविष्यातल्या अनेक गोष्टी ठरतील. राहुल गांधी येतील किंवा काय चर्चा करायची आहे पुढे हे ठरेल. सत्ताधाऱ्यांचा विश्वास तुटून पडेल अशा प्रकारचे प्रक्रिया सुरु झालेल्या आहेत, त्यामुळे कोणी काही बोलून फरक पडणार नाही, असे राऊत म्हणाले. दरम्यान, आपल्या देशात स्वप्न पाहायला बंदी नाही, कोणीही स्वप्न बघू शकतं, असा टोला शिंदे गटाचे मंत्री दादा भुसेजी यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
#WATCH Congress president Mallikarjun Kharge and Congress leader Rahul Gandhi have started to unite the opposition, we welcome it...BJP's view has been that the opposition should not stay together, but this illusion of theirs is going to be shattered . Entire opposition will… pic.twitter.com/1cHhvk7nEE
— ANI (@ANI) April 14, 2023
राऊत यांनी यावेळी उत्तर प्रदेश एन्काऊंटरवर प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये माफिया राज आहे असं तिथल्या लोकांचा आणि राजकीय लोकांचा मत आहे. कायदेशीर कार्यवाही बरोबर पोलिसांना हातात हत्यार उचलावे लागले असेल तर तो त्या सरकारच्या भाग आहे. एन्काऊंटरमध्ये जात आणि धर्म आणू नये. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. बेकायदेशीरपणे अशा हत्या होत असतील तर नक्कीच न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत.
राऊत यांनी फडणवीस यांना इशारा दिला. तुम्ही साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घ्या नाहीतर तुमच्या सागर बंगल्याच्या बाहेर येऊन पत्रकार परिषद घेतो. याचा अर्थ असा होतो की, ते आम्हाला घाबरतात. शिवसेना जर तुम्ही कागदावर दुसऱ्याला दिले तरी खरी शिवसेना येथे आहे. तुम्ही कायद्याने राज्य करा, तपास यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधी पक्षांना खतम करण्याचा कारस्थान तुम्ही करत असाल तर आम्ही बोलणार. तुम्ही तुमची कारस्थान थांबवा. या देशांमध्ये संविधान नाही. कायद्याचं अस्तित्वात नाही, हम करे सो कायदा हे संविधानाचे राज्य नाही, बाबासाहेब आंबेडकरांना जर श्रद्धांजली व्हायचे असेल तर पुन्हा एकदा कायद्याचं राज्य प्रस्थापित करणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले.