मुंबई : मुंबईत मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर पाहता आज(बुधवार) मुंबईतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातल्या शाळा उद्या बंद राहणार आहेत.
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी ही घोषणा केली आहे. दिवाळीच्या सुट्टीमधून उद्याची सुट्टी कमी करण्यात येणार आहे.
The precautionary holiday will be applicable for schools and colleges in Mumbai Metropolitan Region. #MumbaiRains
— Vinod Tawde (@TawdeVinod) September 19, 2017
Schools are instructed to remain close tomorrow for safety due to mixed predictions; This holiday will be compensated in Diwali #MumbaiRains
— Vinod Tawde (@TawdeVinod) September 19, 2017
दरम्यान, येत्या २४ तासात कोकण आणि उत्तर मध्य तसेच दक्षीणमध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईच्या कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. २१ सप्टेंबरनंतर मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून येत्या ७२ तासात विदर्भात वरुणराजा बरसणार आहे.