Coronavirus : जाणून घ्या काय दर्शवतो दुसऱ्या फेरीतील 'सेरो सर्व्हे'चा अहवाल...

सेरो सर्व्हेच्या दुसऱ्या फेरीतील महत्वाची निरीक्षणे  

Updated: Oct 1, 2020, 10:57 PM IST
Coronavirus : जाणून घ्या काय दर्शवतो दुसऱ्या फेरीतील 'सेरो सर्व्हे'चा अहवाल...
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुंबईमध्ये ‘सार्स-कोविड २’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्साचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे. 

नागरिकांमध्ये ऍन्टी्बॉडीजचं प्राबल्य जाणून घेणे हे या सर्व्हेचे मुख्य उद्दीष्ट होते. ज्यासाठी नमूना निवड पध्दतीनुसार (Random Sampling) नमुने संकलित करण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार, तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन या कोरोनाचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्यास करण्यासाठी दोन फेऱ्यांद्वारे सर्वेक्षण घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. 

याअंतर्गत सर्वेक्षणाची पहिली फेरी ही जुलै महिन्याच्या अखेरीस घेण्यात आली होती. आता याच संशोधनांतर्गत दुस-या फेरीतील निष्कर्ष समोर आले आहेत. या  दुस-या फेरी अंतर्गत आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात सदर सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुस-या फेरीत अंदाजित केलेल्यात ५ हजार ८४० एवढया लक्ष्य नमुन्यां पैकी ५ हजार ३८४ नमूने संकलित करण्यात आले.

दुस-या फेरीतील सर्वेक्षणामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. तसेच संस्थात्माक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रीय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले.

सेरो सर्व्हेच्या दुसऱ्या फेरीतील महत्वाची निरीक्षणे

-  दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या निरिक्षणातून असे निदर्शनास आले आहे की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ४५ टक्के आणि बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १८ टक्के याप्रमाणे रक्तातील ऍन्टीनबॉडीज आढळून आल्या.  

- सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ऍन्टीबॉडीजचं प्रमाण तुललेने जास्त असल्याचं पाहायला मिळालं.

-  सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांदरम्यान आरोग्य क्षेत्रात काम करणाऱया व्यक्तिंमध्ये (Health Care Workers) सरासरी २७ टक्के एवढे ऍन्टीबॉडीज आढळून आल्या. या अंतर्गत हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय (Health Office) आणि क्षेत्रस्तरावर (Program Field Staff) काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. 

निरिक्षणाच्या आधारे निष्कर्ष काय निघतो? 

दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणाचे परिणाम असे दर्शवतात की, झोपडपट्टी परिसरातील नमून्यांमध्ये आढळून आलेले ऍन्टीबॉडीजचे आणि बाधित रुग्णांची संख्या (Reported Cases) याचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे. पहिल्या फेरीच्या तुलनेत दुस-या फेरी दरम्यान बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये आंशिक वाढ नोंदविण्याात आली आहे.

 

शिवाय शास्त्रीय पुरव्यांआधारे असे म्हणता येऊ शकते की, बरे झालेले रुग्ण (Record Patient) / लक्षणे नसलेले रुग्ण यांच्यामध्ये काही कालावधी नंतर ऍन्टीबॉडीज पातळीही घसरते; ही बाब दोन्ही फे-यांमधील सर्वेक्षणादरम्यानचा कल दर्शविते. तसेच या बाबीचा प्रतिकार शक्तीवर काही परिणाम होत असल्याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नागी नाही.