हिंदुत्वाची शाल राज ठाकरे यांनी कधी पांघरली? शिवसेनेचं प्रत्युत्तर

'राज ठाकरे हे वैफल्यग्रस्त, सोयीनुसार हिंदुत्त्वाचा मुद्दा काढायचा' संजय राऊत यांनी डिवचलं

Updated: May 22, 2022, 02:48 PM IST
हिंदुत्वाची शाल राज ठाकरे यांनी कधी पांघरली? शिवसेनेचं प्रत्युत्तर title=

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात झालेल्या सभेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) आणि शिवसेनेला (ShivSena) लक्ष्य केलं.  उद्दव ठाकरेंवर आंदोलनाची एक तरी केस आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी घालवताय, असा आरोपही राज ठाकरेंनी केलाय.

यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेवर राज ठाकरे यांनी बोलू नये, शिवसेनेसी क्रेडिबिलटी काय आहे, हे महाराष्ट्र आणि देश जाणून आहे. स्वत:च्या पक्षाविषयी त्यांनी बोलावं, दुसऱ्याच्या पक्षाविषयी बोलू नये, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रात पन्नासवर्षांपासून काम करत आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

बाळासाहेबांची क्रेडिबिलेटी आहे म्हणून हा पक्ष पन्नास वर्ष टीकून आहे. औरंगाबादचं संभाजीनगर झालंच पाहिजे, आणि ते केलेलं आहे, म्हणून तर राज ठाकरे त्याला संभाजीनगर म्हणतायत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळीच सांगितलं होतं, कागदोपत्रीही झालं आहे, केंद्राकडे प्रस्ताव आहे ते मंजूर करतील असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

आमच्या हिंदुत्वाला ढोंगी म्हणणाऱ्यांनी हिंदुत्वाची शाल कधी पांघरली याचा खुलासा करावा. शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रखर राष्ट्रवादी हिंतुत्व आहे. आमच्या हिंदुत्वावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही. आमचं हिंदुत्व तेजाने तळपत राहिल, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

अयोध्येत जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखलं आहे. हा भाजप पुरस्कृत दौरा होता, ही फार गमतीशीर विधानं आहेत. हे वैफल्य आहे. त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. माणसाला वैफाल्याने ग्रासलं की अशाप्रकारची विधान करत असतात, सोयीनुसार हिंदुत्त्वाचा मुद्दा काढायचा, इतर कोणती दुकानं चालली नाहीत की हिंदुत्वाचा मुद्दा काढायचा, असा टोलाही संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. 

मातोश्रीने तुम्हालाही मोठं केलं आहे, सर्वांना मोठं केलंय, मातोश्रीवरची श्रद्धा तुम्ही सांगायची गरज नाही. डोकं ठिकाणावर ठेवा आणि मग बोला. एमआयएमला कोण मोठं करत हे सर्वांना माहित आहे. उद्धव ठाकरे हे पक्षाचे सेनापती आहेत. आमच्यावर जेवढ्या केसेस आहेत, तेवढ्या त्यांच्या पूर्ण पक्षावरही नसतील. राज ठाकरे यांच्यावर कोणती केस आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.