अयोध्या प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

काय म्हणाले संजय राऊत 

Updated: Nov 9, 2019, 12:19 PM IST
अयोध्या प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : अयोध्यातील वादग्रस्त जमिनीचा निकाल अखेर लागला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही रामलल्लाचीच असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह 4 न्यायाधीशांनी हा निकाल जाहिर केला आहे. या निकालावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. 

संजय राऊत यांनी पहिले मंदिर मग सरकार... असं ट्विट केलं आहे. पहले मंदिर फिर सरकार... अयोध्या में मंदिर, महाराष्ट्र में सरकार... जय श्री राम!! असं म्हणत ट्विट केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत गेले 15 दिवस कायम चर्चेत आहेत. महाराष्ट्रात कुणाचा मुख्यमंत्री होणार? या मुद्यावरून नाट्य सुरू असताना शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्य भूमिका बजावली. 

दररोजप्रमाणे संजय राऊत यांनी आज देखील सकाळी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत संजय राऊत म्हणाले की,'आजचा दिवस राजकीय नाही.दरम्यान, राम मंदिराचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा असेल, सरकारचा नव्हे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा जिवंत ठेवल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालय आज गोड बातमी देणार आहे. निकाल कोर्टाचा असेल, सरकारचा नाही, अयोध्येतील आंदोलनात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसैनिकांनी बलिदान दिले आहे. बाबरी मस्जिद पाडल्यावर हे काम शिवसैनिकांनी केले असेल तर ते गर्वाचे असल्याचे एकाच वाघाने म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. राम मंदिरचा मुद्दा शिवसेनेने जीवंत ठेवलाय. अयोध्येत राम मंदिर होणार, असे सांगत काहीही पळ काढला. मात्र, शिवसेना ठाम राहिली.'