मुंबई : आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) मंगळवारी बाहेर गावावरून आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन (Home Qurantine) करण्यात आलं आहे. होम क्वारंटाईन असल्यामुळे आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या (ED) चौकशीकरता बोलावले असताना उपस्थित राहता येणार नाही. त्याचप्रमाणे विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) यांच्या पत्नी आजारी आहेत. त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामुळे पुढील आठवड्यात प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांना एकत्र चौकशीसाठी बोलवावे अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडी अधिकाऱ्यांना केली आहे.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर काल (२४ डिसेंबर) ईडी (ED) ने छापा टाकला होता. त्यांचे पुत्र विहंग यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. आज प्रताप सरनाईक यांना बोलावण्यात आले होते. मात्र होम क्वारंटाईन असल्यामुळे ते गेले नाहीत. ईडीने सरनाईक यांच्या मालमत्तेवर छापे टाकले होते. विहंगला ही आज पुन्हा चौकशीला बोलावले आहे. काल ईडीकडून विहंगची ६ तास चौकशी झाली. सध्या सरनाईक परीवार मुंबईलाच असल्याची माहिती समोर येतेय.
सरनाईक हे स्वत: बांधकाम व्यावसायिक आहेत. ते शिवसेनेचे प्रवक्ता असून गेले ते शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. प्रताप सरनाईक गेल्या काही दिवसांपासून कंगना प्रकरण, अर्णब गोस्वामी प्रकरण आणि अन्वय नाईक प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय.
केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजप ईडी सारख्या संस्थांचा वापर करुन भाजपविरोधात बोलणाऱ्या नेत्यांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय.