राज्यातील सत्तातरानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटात सत्तासंघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर सातत्यानं टीका करण्यात येत आहे. सभा आणि मेळाव्यामधून एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील शिवसेनेच्या सर्व गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बोलताना उद्धध ठाकरे यांनी ंमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरुनही जोरदार टीका केलीय.
"मुंबईवर लचके तोडणारी गिधाडं फिरू लागलीयत. अमित शहा म्हणाले सेनेला जमिन दाखवा. पण त्यांना माहिती नाही की इथल्या जमिनीत तलवारीची पाती आहेत. आम्ही तुम्हाला आस्मान दाखवू. मुंबई आमच्यासाठी मातृभूमी आहे," असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलाय.
25 वर्षे आमची युतीत सडली. नालायक माणसं आम्ही जोपासली. वरती पोहचल्यावर लाथा मारायला लागलात. तुमचा वंश कोणता ? बाहेरचे उपरे किती घेतले तुम्ही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही केवळ महापालिका नाही तर मुंबईकरांची मनेही जिंकली आहेत. मुंबई विकून दिल्लीश्वरांच्या पुढे टाकायची हे तुमचं ठरलंय असे उद्धव ठाकरे म्हणाले.