किरिट सोमय्या, नारायण राणे यांचा भ्रष्टाचार बाहेर काढून दाखवा, सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

उद्धव ठाकरे यांच्या माफियांविरोधात दिल्लीला मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे

Updated: Sep 30, 2021, 04:35 PM IST
किरिट सोमय्या, नारायण राणे यांचा भ्रष्टाचार बाहेर काढून दाखवा,  सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान title=

मुंबई : भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) ठाकरे सरकारमधील मंत्री आणि नेत्यांविरोधात सातत्याने हल्लाबोल करत आहेत. आता किरिट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनाच आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या माफियांविरोधात दिल्लीला मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. दिल्ली ला जाऊन ईडी (ED) आणि बँकिंग सेक्रेटरी ला भेटणार असल्याचं ते म्हणाले.. 

किरिट सोमय्या आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी काय भ्रष्टाचार केला हे उद्धव ठाकरे यांनी शोधून दाखवावं असं आव्हान किरिट सोमय्या यांनी दिलं आहे. 

किरिट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे 3 घोटाळ्या संबंधित निवेदन आणि कागदपत्र राज्यपालांना दिली, तसंच  चौकशीची विनंती केली. यावर राज्यपालांनी निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं.

ग्राम पंचायतला येणारे पैसे ढापण्याचा प्रयत्न हसन मुश्रीफ आणि उद्धव ठाकरेंचे 19 चोर करतात,  उद्धव ठाकरेंच्या माफियांविरोधात दिल्लीला मानवाधिकार आयोगाकडे तक्रार तसंच पोलिसांना गुंड बनवून मला अडवलं गेलं, कोंडलं गेलं यावर तक्रार करणार असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांनी स्वतः 7 कोटीची चोरी केली आहे. साडे अठरा कोटी रुपये रोख काढून लंपास केले हे पुरावे ईडीकडे आले आहेत माझ्याकडेही आहेत असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांना लपवणे बंद करावं आणि सरळ ईडी ला सुपूर्द करावं अशी टीकाही किरिट सोमय्या यांनी केली आहे.