मुंबईकरांनो कोरोनाबाबतची ही मोठी बातमी वाचली का?

शहरातील सर्वात मोठा कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या.... 

Updated: Jun 10, 2020, 08:04 PM IST
मुंबईकरांनो कोरोनाबाबतची ही मोठी बातमी वाचली का?  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई :  Coronavirus कोरोना व्हायरसनं भारतात शिरकाव केला आणि पाहता पाहता संपूर्ण देशाला या विषाणूनं विळखा घातला, देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना अतिशय वेगानं पसरला. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव चिंतेत टाकणाऱ्या वेगानं झाला. यात सर्वाधिक रुग्ण आढळले ते म्हणजे मायानगरी मुंबईमध्ये. 

मुंबईची एकंदर लोकसंख्या, इथे असणाऱे असंख्य स्थलांतरित हा एकंदर आकडा पाहता कोरोनाचा मुंबईत होणारा फैलाव म्हणजे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे एक मोठं आव्हान होऊन उभा राहिला. सध्याही परिस्थिती पूर्णेपणे सुधारलेली नाही. असं असलं तरीही या तणावाच्या वातावरणात मुंबईकरांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. 

देशात कोरोना व्हायरसची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याची बाब निदर्शनात आली आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येची दुपटीने वाढ होण्याचं प्रमाण १६ दिवसांचं असताना मुंबईत हे प्रमाण किंवा हे अंतर मात्र २४.५ दिवसांवर पोहोचलं आहे. 

शहरातील सर्वात मोठा कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीतील डबलींग रेट ४४ दिवसांवर गेला आहे. तर या ठिकाणी रुग्णसंख्या वाढीचं प्रमाण १.५७%  इतकं आहे. 

 

...म्हणून ऊसतोड कामगारांना कोरोनाची लागण नाही

पाहा ही दिलासादायक आकडेवारी 

मुंबईचा रुग्णसंख्यावाढीचा दर जवळपास २० दिवसांपूर्वी ६.६१ % होता जो आता २.८२% वर पोहोचला आहे. तर, मृत्यू दर राष्ट्रीय सरासरी एवढा म्हणजे ३% झाला आहे. इतकंच नव्हे तर, मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ४४% इतका आहे. या साऱ्यामध्येच मुंबईत आता ५ % च्या पुढे रुग्णसंख्या वाढ असणारे केवळ २ विभाग उरले आहेत. जेथे परिस्थिती आव्हानात्मक आहे. ते म्हणजे पी उत्तर-- मालाड, मालवणी , दिंडोशी-- ५.९% आणि आर उत्तर-- दहिसर-- ५.७%. ही एकंदर आकडेवारी पाहता वैश्विक महारमारीला आता मुंबईकर आणि हे कधीही न थांबणारं शहर अखेर थांबूनच नमवण्यात यशस्वी ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.