close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शिवसेनेचा खोटारडेपणाचा आरोप अमान्य, युतीतील दरी आणखी रुंदावली

 वर्षा बंगल्यावर भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक

Updated: Nov 8, 2019, 07:36 PM IST
शिवसेनेचा खोटारडेपणाचा आरोप अमान्य, युतीतील दरी आणखी रुंदावली

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जो आरोप केला आहे ते आम्हाला अमान्य असल्याचे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. वर्षा बंगल्यावर भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. यानंतर ते बोलत होते. आम्हाला कोणताही खोटारडेपणा करायचा नाही. आम्हा दीन, दलित, वचिंत शोषितांसाठी राज्य करायचे असल्याचे ते म्हणाले. 

शिवसेनेकडून पहिल्या दिवशी पर्यायाची भाषा केली गेली. भाजपाला खोट ठरवण्याआधी शिवसेनेने विचार केला पाहीजे. जनादेश हा जनतेची सेवा करण्यासाठी महायुतीचे सरकार यावे यासाठी आहे. मोदींवर ज्यांनी टीका केली ते विरोधी पक्षात होते. पण सत्तेत राहून मित्र पक्षांनी टीका केली नव्हती. 
आम्हाला सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी काम करायचे आहे.

राम मंदीर प्रश्नासाठी आम्ही उत्तर प्रदेशाचे सरकारही कुर्बान केले. आम्हाला राम मंदीरही महत्त्वाचे आहे. राम मंदीर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. प्रभु रामाच्या तत्वावर आम्ही चालतो. आम्ही आजही जनादेशाचा आदर करत असल्याचे ते म्हणाले.