'राज्याच्या मंत्र्यांची सीबीआय चौकशी करा', भाजप आमदाराची अमित शाहंकडे मागणी

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी राज्य सरकारमधल्या नेत्यांची आणि मंत्र्यांचीही सीबीआयकडून चौकशी व्हावी

Updated: Aug 30, 2020, 08:10 PM IST
'राज्याच्या मंत्र्यांची सीबीआय चौकशी करा', भाजप आमदाराची अमित शाहंकडे मागणी

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी राज्य सरकारमधल्या नेत्यांची आणि मंत्र्यांचीही सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. या मागणीचं पत्र अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं आहे. राज्यातील मंत्र्यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला आहे. 

बॉलीवूड, ड्रग्ज आणि राजकारणी यांचि विषारी युती समोर येऊ नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारमधल्या नेत्यांचाही सीबीआयने भांडाफोड केला पाहिजे. फक्त रिया चक्रवर्ती आणि तिच्या मित्रांची चौकशी पुरेशी नाही, तर केसमध्ये गुंतागुंत वाढवणारं राज्याचं गृहमंत्रालय आणि पोलिसांवर दबाव टाकणारा नेता (मंत्री?) यांचीही सीबीआयकडून चौकशी व्हावी, तरंच सत्य समोर येईल, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.