नगरसेवकांकडे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना झटका

Updated: Jul 1, 2019, 03:10 PM IST
नगरसेवकांकडे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: नगरसेवकांकडे ५० लाखांची लाच मागणाऱ्या जात पडताळणी समितीच्या तीन सदस्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निलंबित करावे, असे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी सोमवारी दिले. 

जुलै २०१८ मध्ये पावसाळी अधिवेशनात अनिल परब यांनी नगरसेवकांकडे लाच मागिल्याच्या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला होता. तेव्हा सभापती यांनी तात्काळ संबंधित तीन जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी निलंबित कऱण्याचे आदेश दिले होते. 

मात्र, आता वर्ष उलटत असतानाही कोणताही कारवाई न झाल्याने या अधिवेशनात अनिल परब यांनी हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. तसेच संबंधित अधिकारी हे मॅटमध्ये जातील या भीतीने कारवाई केली जात नाही का, असा मुद्दाही अनिल परब यांनी मांडला आहे.

आज पुन्हा हा विषय उपस्थित केला असता मुख्यमंत्र्यांनी स्वतःच संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश सभापती यांनी दिले.