मुंबई : मुंबई शरीरसौष्ठवाचा पाया असलेली 'नवोदित मुंबई श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा नुकतीच पार पडली.
यामध्ये अंधेरीच्या 'फॉर्च्युन फिटनेस'च्या सुयश पाटीलने बाजी मारत जेते पद पटकावले.
यावेळी चाहत्यांनी अंधेरीच्या राजाचा विजय असो अशी घोषणाबाजी करून जेतेपदाचा आनंद साजरा केला. यंदाच्या नवोदित श्री चे आयोजन गणेश गल्ली येथील प्रांगणात करण्यात आले होते.
प्रत्येक गटात ४०-४५ खेळाडू असल्यामुळे यातून आधी १५ खेळाडूंची आणि मग पाच खेळाडूंची निवड करण्यात आली. प्रत्येक गटात एकाच ताकदीचे ४-५ खेळाडू असल्यामुळे गटविजेता निवडणेही आव्हान होते.
परब फिटनेसच्या किशोर राऊत, नितीन रुपाले या दोन खेळाडूंनी गटविजेतेपद पटकावले. तर परळच्या हर्क्युलस जिमच्याही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यांचाच समीर भिलारे उत्कृष्ट पोझरचा मानकरी ठरला.
तब्बल तीन हजारांपेक्षा अधिक क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेत उमरखाडी, लालबाग, परळ आणि अंधेरीच्या चाहत्यांनी केलेली घोषणाबाजी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
तब्बल २२० नवोदित शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या प्रत्येक गटात ४०-४५ स्पर्धकांची स्टेजवर झालेली गर्दी पाहून मुंबई शरीरसौष्ठव संघटनेची ताकद सर्वांनी पुन्हा एकदा दिसली. प्रत्येक गटात स्पर्धक स्टेजवर येताच जणू पूर्ण स्पर्धेचे स्पर्धक एकाच वेळी स्टेजवर आले की काय असे चित्र दिसत होते.
अंतिम लढतीसाठी मंचावर सात शरीरसौष्ठवपटू येताच गर्दीच्या एका टोकाकडून 'मुंबईच्या राजाचा विजय असो...' तर दुसऱ्या कोपऱ्यातून 'ही शान कुणाची... उमरखाडीच्या राजाची... ' तर खुर्च्यांवर बसलेल्या एका गटाने 'अंधेरीच्या राजाचा विजय असो...' अशा घोषणा करून गणेश गल्ली दणाणून सोडली.
मुंबईतील अनेक दिग्गज शरीरसौष्ठवपटूंचे गुरू असेलल्या मनोहर पाठारे यांना या स्पर्धेच्या निमित्ताने शेकडो शरीरसौष्ठवपटूंनी अनोखी आदरांजली वाहिली.
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने चोख व्यवस्था पार पाडली. आयोजनासाठी बृहन्मुंबईचे संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, उपनगरचे सुनील शेगडे, आणि संजय चव्हाण यांनी अथक परिश्रम केले.
५५ किलो वजनी गटः
१. किशोर राऊत (परब फिटनेस), २. अविनाश वणे (पॉवर ऍड), ३. ऋषिकेश परब ( कृष्णा जिम), ४. अजिंक्य पवार (बाल व्यायामशाळा), ५. उपेंद्र पांचाळ (आर.एम.भट).
६० किलो वजनी गटः
१. साजिद मलिक (हार्डकोर), २. आकाश घोरपडे (स्लिमवेल), ३. तुषार गुजर (मातोश्री), ४. गिरीष मुढे (बॉडी वर्पशॉप), ५. गोपाळ सोनार (सॅमच्युन).
६५ किलो वजनी गटः
१. विनायक गोळेकर ( मातोश्री), २. चेतन खारवा ( ग्रो मसल), ३. आदेश चिंचकर (आर.एम.भट), ४. कौशल खाडे (एम फिटनेस), ५. प्रज्योत जाधव (मसल ऍण्ड माइंड).
७० किलो वजनी गटः
१. सुजीत महापत (लीना मोगरे), २. महेश पवार (पॉवर जिम), ३. आशिष लोखंडे ( आर.एम.भट), ४. निनाद जाधव (बॉडी वर्पशॉप), ५. प्रशांत शिर्के (माँसाहेब).
७५ किलो वजनी गटः
१. समीर भिलारे ( हर्क्युलस जिम), २. अमोल जाधव ( गुरूदत्त जिम), ३. कल्पेश मयेकर ( परब फिटनेस), ४. गणेश सावंत (सालम जिम), ५. संतोष भेंडू (परब फिटनेस).
८० किलो वजनी गटः
१. सुयश पाटील (फॉरच्युन फिटनेस), २. सिद्धीराज परब ( रिगल जिम), २. रोहन कांदळगावकर ( फोकस फिटनेस), ४. शहाजी चौगुले (मेघाली जिम), ५. कपिल नालगुडे (गुरूदत्त).
८० किलोवरील वजनी गटः
१. नितीन रुपाले (परब फिटनेस), २. रविकांत पाष्टे (हर्क्युलस फिटनेस), ३. जावेद सय्यद (एम.जी.फिटनेस), ४. निलेश रेमजे (क्रिएटर जिम), ५. अक्षय माँगटी (सालम जिम).
उत्कृष्ट पोझरः समीर भिलारे (हर्क्युलस जिम)
नवोदित मुंबई श्रीः सुयश भिलारे (फॉरच्युन फिटनेस)