तापमान वाढल्याने मुंबईकर घामाघूम

दोन आठवड्यापूर्वी पावसाने दणका दिल्यानंतर पाऊस गायब आहे. मात्र, पावसाच्या दडीमुळे तापमानात वाढ झालेय. त्यामुळे मुंबईकर घामाघूम झालाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 9, 2017, 08:18 AM IST
तापमान वाढल्याने मुंबईकर घामाघूम title=

मुंबई : दोन आठवड्यापूर्वी पावसाने दणका दिल्यानंतर पाऊस गायब आहे. मात्र, पावसाच्या दडीमुळे तापमानात वाढ झालेय. त्यामुळे मुंबईकर घामाघूम झालाय.

मुंबई आणिपरिसरातून पावसाचा जोर कमी झालाय. त्याचवेळी तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभर आकाश ढगाळलेले होते. चढलेला पारा आणि वाढलेली आर्द्रता यामुळे मुंबईकर घामाघूम झाला.

मुंबईत मागील आठवड्यापासून पावसाचा जोर कमी होत आहे. शुक्रवारी सकाळपासून आकाश ढगाळलेले होते. दुपारी मुंबईत काही भागांत पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. त्यानंतर पाऊस गायब झाला. त्यामुळे वातावरणात उष्मा अधिकच वाढला. मुंबईत दिवसभरात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलेय.

राज्यात विदर्भात अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा येथे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, नागपूरमध्ये ३४ तर राज्यात सर्वाधिक ३६ अंश सेल्सिअस तापमान यवतमाळ येथे नोंदवण्यात आले. पुढील २४ तासांत मुंबई व परिसरात आकाश ढगाळलेले राहील. मात्र, तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असेल.