बाईकस्वार भरधाव वेगात आला आणि नाल्यात पडला, विचित्र अपघाताचा VIDEO व्हायरल

मुंबईतल्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Updated: Mar 26, 2022, 03:46 PM IST
बाईकस्वार भरधाव वेगात आला आणि नाल्यात पडला, विचित्र अपघाताचा VIDEO व्हायरल title=

मुंबई : मुंबईतल्या मालाडमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे.  भरधाव वेगातील बाईकस्वार नाल्यात कोसळल्याची घटना घडलीय. मालाड मालवणी गेट नंबर 6 याठिकाणी एक बाईक स्वार भरधाव वेगाने जात होता. 

त्याचवेळी त्याचं बाईकवरील नियंत्रण सुटलं. आणि तो रस्त्याच्या लगत असणाऱ्या भिंतीला धडक देऊन लगतच्या नाल्यात पडला. हा सर्व प्रकार इथल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

अपघातानंतर रस्त्यावरुन प्रवास करणारे काही नागरिक तात्काळ वाहनं थांबवून बाईकस्वाराच्या मदतीला धावल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. सुदैवाने या अपघातातील बाईकस्वार थोडक्यात बचावला. लोकांनी त्याला मदतीचा हात देत बाहेर काढलं. 

या अपघातात तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.