घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या बसमध्ये घडली भयानक घटना; मृतदेह पाहून उडाला थरकाप

Mumbai Crime News: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बस मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्य्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. धावत्या बसमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे . 

Updated: Nov 30, 2022, 05:02 PM IST
घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या बसमध्ये घडली भयानक घटना; मृतदेह पाहून उडाला थरकाप  title=

Crime News:  घाटकोपर येथून उदयपूरला(Ghatkopar to Udaipur ) जाणाऱ्या धावत्या बसमध्ये एक भयानक घटना घडली आहे. ही बस मुंबई अहमदाबाद हायवेवर(Mumbai Ahmedabad Highway) पोहचल्यावर धावत्या बसमध्येच मृतदेह आढळला. हा मृतदेह पाहून बसमधील प्रवाशांचा थरकाप उडाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि या घटनेचा तपास सुरु केला आहे. 

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बस मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्य्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. धावत्या बसमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे . घाटकोपर येथून निघालेली ही बस राजस्थान मधील उदयपूर येथे जात असताना चारोटी टोलनाक्याजवळ ही घटना उघडकीस आली. 

घोडबंदरला बसमध्ये बसलेल्या एका अनोळखी प्रवाशाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. सहप्रवासी आणि बस चालकाने तात्काळ बस कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले. 

या इसमाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं उघडकीस आले आहे. यानंतर कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले . या प्रवासाची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांमार्फत सुरू असून अधिक तपास कासा पोलीस करत आहेत.