काय सांगता! चक्क नगपरलिकेचं उद्यान गेलं चोरीला; वाचा नेमकं प्रकरण काय?

 Badlapur News:सोनं,पाकीटं किंवा घरातील वस्तु  चोरीला गेल्याच्या बातम्या तुम्ही वारंवार वाचल्या किंवा ऐकल्या असतीलचं. परंतु मुंबईत चक्क पालिकेचे उद्यान गेलं चोरीला गेल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. बदलापूर नगरपालिकेचं उद्यान चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.त्यामुळे  उद्यान चोरीला कसं जाऊ शकतं ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

Updated: Oct 20, 2023, 05:24 PM IST
काय सांगता! चक्क नगपरलिकेचं उद्यान गेलं चोरीला; वाचा नेमकं प्रकरण काय? title=

Badlapur News: बदलापूर शहराच्या मध्यभागी वसलेलं छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या बाजूला असलेलं महापालिकेचं उद्यान.हे उद्यान चोरीला गेल्याची घटना घडली आहे.बदलापूरमधील एका गावामध्ये हा अचंबित करणारा प्रकार घडला आहे. परंतु हे उद्यान (Garden) चक्क चोरीला गेल्याची तक्रार एका व्यक्तीने नगरपालिकेच्या कार्यालयात (Badlapur Municipal Council) केली आहे.

हा संपुर्ण प्रकार एखाद्या सिनेमाच्या कथानकापेक्षा वेगळा वाटत नाही.घरांच्य़ा सोयीस्कर किंमती शिवाय निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचं बदलापूर हे आकर्षणाचं शहर बनतयं.त्यामुळे मुंबईकरांचा कल या शहराकडे वाढतो आहे.

परंतु या तक्रारीनंतर सर्वसामान्यांच्या सोयींच्या अभाव,प्रशासनाच्या कामकाजातील त्रूटी या व्यक्तीनं निदर्शनास आणण्याचं काम केलं आहे.याचा परिणाम स्थलांतरित नागरिकांच्या मानसिकतेवर होतोय.मनसेचे बदलापूर विभाग अध्यक्ष किरण भगत यांनी नगरपालिकेकडे याबद्दल तक्रार केलीये.

साधारणत 2005 साली (Chhatrapati Shivaji Maharaj Udyan ) छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी हे उद्यान बांधण्यात आले होते,असं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. शिवाय या उद्यानाच्य़ा पुनर्बांधणीसाठी प्रस्ताव दिला असता या प्रस्तावाकडे नगरपालिकेने कानाडोळा केला.

 मात्र गावातील एकमेव असलेल्या या उद्यानाचं अस्तित्वच नाहीसे झालं आहे.(Badlapur) एकेकाळी हिरवंगार नेहमी बहरलेलं,वयस्क नागरिकांच्या वावराने प्रफुल्लित करणारं हे उद्यान होतं.काळानुरुप वाढत्या शहरीकरणाच्या नादात प्रशासनाचं देखील या उद्यानाकडे दर्लक्ष झाले,आणि  कालांतराने ते निस्तानाबुत झालं.शहराच्य़ा मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उद्यानाच्य़ा  मोकळ्या जागेवर फेरीवाले,टपरीवाल्यांचं अतिक्रमण वाढतयं.असे प्रकार होत राहिले तर लहान मुलांना खेळण्यासाठी हे उद्यान कायमचं बंद होईल .त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी किरण भगत यांनी केलीय.
 
आता या उद्यानात खेळणी राहिली आहेत ना उद्यानाची सुरक्षा भिंत , त्यामुळे भविष्यात या जागेवर अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही ,त्यामुळे गावातील लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल उद्यान आम्हाला परत मिळावं अशी मागणी किरण भगत यांनी पालिकेकडे केली आहे.