मुंबई : हवामान विभागाने आज मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सायंकाळी 4 नंतर मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. रायगड जिल्ह्याला देखील 2 दिवसांचा अलर्ट जारी करण्यात आला असून. ठाणे-पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. परंतु जनजीवन सुरळीत सुरू आहे. पाणी तुंबलेले नसल्याने लोकल सेवादेखील सुरळीत सुरू आहेत. परंतु हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिला आहे.
येत्या काही तासात मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने ट्वीट करून तशी माहिती दिली आहे.
Maharashtra: Intense to very intense spells of rain are expected to occur till 4 pm today in Mumbai, Palghar, Thane and Raigad districts, as per India Meteorological Department
— ANI (@ANI) July 21, 2021
दरम्यान, आज वसई-विरार नालासोपारा परिसरात मुसळधार पाऊस झाला असून, रस्त्यांवर 2 फुटांपर्यंत पाणी साचल्याचे दिसून येत आहे.