कोरोना काळात कोकणस्थ वैश्य समाज संस्थेची सामाजिक बांधिलकी

सध्या कोविड-१९ या (Covid-19) साथीचा उद्रेक (coronavirus) क्षमविण्यासाठी डॉक्टर (Doctor) आणि पोलीस (Police) हे कोविड योद्धे अहोरात्र झटत आहेत.  

Updated: Nov 11, 2020, 11:49 AM IST
कोरोना काळात कोकणस्थ वैश्य समाज संस्थेची सामाजिक बांधिलकी  title=

मुंबई : सध्या कोविड-१९ या (Covid-19) साथीचा उद्रेक (coronavirus) क्षमविण्यासाठी डॉक्टर (Doctor) आणि पोलीस (Police) हे कोविड योद्धे अहोरात्र झटत आहेत. परंतु कर्तव्यदक्ष पोलिसांचे त्यांच्या कर्तव्यापुढे स्वत:च्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष होत आहे. परंतु कोरोनाच्या या लढाईत सामाजिक संस्था देखील कुठे मागे नाहीत. मुंबईतील कोंकणस्थ वैश्य समाज (Koakanstha Vaisya Samaj) या १३३ वर्षे जुन्या सामाजिक संस्थेने कोरोनाच्या या लढाईत आपला खारीचा वाटा उचलला आहे. कोरोनाच्या काळात संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी (social commitment) जपली आहे.

संस्थेतर्फे दक्षिण मुंबईतील २० पोलीस ठाण्यांना सुमारे सव्वा लाख रुपयांची औषधे आणि इतर आरोग्यदायी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मध्ये २५ जणांना २० दिवस पुरेतील एवढ्या vitamin C च्या गोळ्या, सॅनिटाईजर (Sanitizer), face shield, फेस मास्क ( mask), हँडग्लोवज आदी साहित्याचा समावेश आहे. सामाजिक बांधिलकीबाबत  संस्थेचे अध्यक्ष विजय रामचंद्र हेगिष्टे यांनी सांगितले, जेव्हा जेव्हा या देशावर संकट आले आहे. तेव्हा तेव्हा संस्थेने आपली राष्ट्र कर्त्यव्याची भूमिका निभावली आहे. मग तो २६/ ११ च्या अतिरेकी हल्यात लढणार्‍या पोलीस आणि कमांडोजच्या भोजनाची व्यवस्था असो वा कोंकणातील महापूर असो. २०२० चे रायगडमधील चक्रीवादळ असो वा कोविड-१९ चा उद्रेक असो. या प्रत्येक संकटात संस्थेने आपले योगदान दिले आहे आणि आम्ही हे सर्व सामाजिक बांधिलकी पोटी केले आहे. आणि या पुढेही करणार. 

दक्षिण मुंबईतील सुमारे १५ पोलीसठाण्यांना प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित पोलीस अधिकार्‍यांना औषधे आणि इतर आरोग्यदायी वस्तू सुपूर्त केल्या. या उपक्रमाची सुरुवात भोईवाडा पोलीस स्टेशन,परेल येथून झाली आणि समारोप आग्रीपाडा या पोलीसठाण्याने झाला. यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय रामचंद्र हेगिष्टे, चिटणीस सौ. जागृती ज. गांगण आणि खजिनदार प्रदीप सीताराम गांगण, विश्वस्थ अनिरुध्द शेटये , संजय गांगण व इतर व्यवस्थापक पंच मंडळ सदस्यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमात A.T.S. पोलीस इन्स्पेक्टर, संस्थेचे हितचिंतक संतोष भालेकर यांनी पोलीसठाण्यांशी भेट घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली.