सोशल मीडियावर कांद्याचे टिकटॉक व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावरही कांद्याचीच चर्चा...

Updated: Dec 7, 2019, 07:19 PM IST
सोशल मीडियावर कांद्याचे टिकटॉक व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : कांदा सध्या भाव खातो आहे. कांदा फक्त बाजारातच भाव खात नाही तर, तो सोशल मीडियावरही भाव खातो आहे. कांद्याचे भाव वाढल्यामुळे सोशल मीडियावर कांद्याचे टिकटॉक व्हिडिओ तुफान व्हायरल होऊ लागले आहेत. कांदा भाव खातोय. उन्हाळ कांदा दोनशे रुपये किलोवर तर लाल कांद्यानं शंभरी गाठली आहे. कांद्याचं महाग होणं सोशल मीडियावर अॅक्टिव्ह तरुणाईलाही समजलं आहे. त्यामुळंच टिकटॉकवर कांद्याचे एकाहून एक लोकप्रिय व्हिडिओ पडू लागले आहेत. 

कांदा किती महागलाय हे सांगण्यासाठी अनेक टिकटॉक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. कांदा एवढा महागला की कांदा आता भाजीला नुसताच दाखवला जातो आहे. कांदा एवढा मौल्यवान झालाय की कांदा आता तिजोरीत ठेवला जाऊ लागले आहेत. एकमेकांच्या सख्ख्या शेजारीही महिलाही आता कांद्यावर हात की सफाई करत आहेत. जेव्हा प्रेयसी हातात सोन्याच्या बांगड्या दाखवते तेव्हा प्रियकर तिला त्याच्या खोलीतला कांद्याचा साठा दाखवून इंप्रेस करतो. असे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

कांदा खाणं हे श्रीमंतीचं लक्षण झालं आहे असंच हे व्हिडिओ सांगत आहेत. जेवताना ज्यांना कच्चा कांदा खायची आवड आहे ते आता फक्त कांद्याचा वास घेऊनच जेवत आहेत. कांद्याने ग्राहकांचे वांदे केले असले तरी हा कांदा सोशल मीडियावर तुफान लाईक्स आणि हिट्स गोळा करतोय.