मुंबई : राज्यातील रस्ते आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबद्दल चर्चा करण्यात आली.
मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडल्यानं कंत्राटदाराला बरखास्त करण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. एमईपी कंत्राटदाराला बरखास्त करून त्याच्या जागी दोन नवे कंत्राटदार नेमण्यात येतील, असं नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं.
मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते लांजापर्यंतचे 92 किमी पॅकजचे काम असलेल्या एमईपी कंत्राटदाराला बरखास्त करुन दोन नविन कंत्राटदार नेमण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. येत्या 15 दिवसात ही कार्यवाही होईल.