सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या कार्यकारिणीत मोठे बदल, पाहा कोणाला मिळालं स्थान

Mumbai News : अखंड महाराष्ट्रासह मुंबईकरांची प्रचंड श्रद्धा असणाऱ्या श्री सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या कार्यकारिणीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.   

कृष्णात पाटील | Updated: Sep 23, 2023, 02:16 PM IST
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या कार्यकारिणीत मोठे बदल, पाहा कोणाला मिळालं स्थान  title=
Veena More patil elected on mumbais siddhivinayak mandir trust

Siddhivinayak Ganpati : सर्वत्र गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2023) माहोल सुरु असतानात श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरानं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी, महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला आणि गणेशोत्सवासह सुट्टीच्या दिवशी सिद्धीविनायक मंदिरात प्रचंड गर्दी होते. भाविकांना बाप्पाचं दर्शन सोयीनं व्हावं यासाठी मंदिर प्रशासनही सातत्यानं प्रयत्न करताना दिसतं. इतकंच नव्हे, तर विविध समाजोपयोगी कामांसाठीसुद्धा मंदिरातील विश्वस्त मंडळाकडून कायमच मदतीचा हात दिला जातो. 

श्रद्धा आणि समाजकार्य यांची सुरेख सांगड घालणाऱ्या याच मंदिराच्या कार्यकारिणीमध्ये आता काही बदल करण्यात आले आहेत. वीणा मोरे पाटील यांची प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. 

हेसुद्धा पाहा : मुंबईतील St. Xavier’s College ते संयुक्त राष्ट्र; पाकिस्तानला खडसावणाऱ्या पेटल गहलोत आहेत तरी कोण? 

Veena More patil elected on mumbais siddhivinayak mandir trust

 

सध्याच्या कार्यकारी अधिकारी नंदा राऊत यांच्या जागी वीणा मोरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांच्या वतीनं समोर आली. सध्याच्या कार्यकारी अधिकारी नंदा राऊत यांच्यावर मनसे कडून गैरव्यवहाराचे आरोप झाले होते आणि त्यांच्या चौकशीची मागणीही करण्यात आली होती. ज्यानंतर आता ही नवी नियुक्ती करण्यात आली आहे. एका नव्या पदाची जबाबदारी हाती आलेल्या मोरे पाटील या सध्या शालेय शिक्षण विभागात अपर सचिव पदावर कार्यरत आहेत, तेव्हा आता नव्या पदाची जबादारी त्या कशा पार पाडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.