close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

या कारणाने रितेश देशमुखचा बाप्पा आहे सर्वात खास, बघा व्हिडिओ

२५ ऑगस्टपासून गणेश उत्सवाला जल्लोषात सुरूवात झाली. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष अधिक बघायला मिळतो. यात बॉलिवूड कलाकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. अनेक बॉलिवूड कलाकारांनी गणेशोत्सवाची अनेक छायाचित्र सोशल मीडियात शेअर केली आहेत. इतकेच काय तर मुकेश अंबानी यांच्याकडे या निमित्ताने एका पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, यात सर्वात खास गणपती अभिनेता रितेश देशमुख याचा आहे.

Updated: Aug 28, 2017, 10:42 AM IST
या कारणाने रितेश देशमुखचा बाप्पा आहे सर्वात खास, बघा व्हिडिओ

मुंबई : २५ ऑगस्टपासून गणेश उत्सवाला जल्लोषात सुरूवात झाली. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष अधिक बघायला मिळतो. यात बॉलिवूड कलाकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. अनेक बॉलिवूड कलाकारांनी गणेशोत्सवाची अनेक छायाचित्र सोशल मीडियात शेअर केली आहेत. इतकेच काय तर मुकेश अंबानी यांच्याकडे या निमित्ताने एका पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, यात सर्वात खास गणपती अभिनेता रितेश देशमुख याचा आहे.

रविवारी रितेशने एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तो स्वत: इको फ्रेन्डली गणपती तयार करताना दिसत आहे. हा गणपती रितेशने शेतक-यांना समर्पित केलाय. यात त्याने सांगितलं की, तो स्वत: एका शेतक-याचा मुलगा आहे. रितेशचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगला गाजत आहेत. या व्हिडिओला लाखों लाईक्स मिळाले असून आणि हजारो लोकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. 

मराठमोळ्या रितेशचा हा मराठमोळा अंदाजही त्याच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे. तुम्हाला कसा वाटला रितेशचा हा बाप्पा?