महिलांवर अत्याचार : मुख्यमंत्री कडाडले, आरोपीला तात्काळ उचला

 राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.  

Updated: Feb 5, 2020, 10:55 PM IST
महिलांवर अत्याचार : मुख्यमंत्री कडाडले, आरोपीला तात्काळ उचला
संग्रहित छाया

मुंबई : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश गृहविभागाला दिले आहेत. महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत, असे सांगतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. आरोपीला उचला, फटकवा, काहीही करा, असे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. 

हिंगणघाटमधील घटनेवर राज्यात संतापाची लाट असताना औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये एका महिलेला जाळल्याचा प्रकार समोर आला. त्यात हिंगणघाटच्या तरुणीची प्रकृती स्थीर असली तरी चिंता कायम आहे. दरम्यान, महिलांवरचे अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रमुखांना दिल्यायत. महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेश, तेलंगणासारखा कायदा करता येईल का, याचा विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महिलेला जाळले

दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे शिक्षिकेला भर चौकात पेट्रोल अंगावर टाकून जाळण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आता औरंगाबादमध्ये एका ५० वर्षीय महिलेला गावातील एका व्यक्तीने जाळून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर पीडित औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. सिल्लोडमध्ये हिंगणघाटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. महिलेला घरात घुसून जिवंत जाळल्यानंतर संताप आणि चिड व्यक्त होत आहे. अंधारी गावात ही महिला राहाते. संतोष मोहिते हा रविवारी रात्री तिच्या घरी गेला आणि शरिरसुखाची मागणी करू लागल्याचा महिलेच्या नातेवाईकांचा आरोप आहे. तिने नकार दिल्यावर संतोषने तिला मारहाण केली आणि घरातले रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला जाळले. ही महिला ९५ टक्के भाजली आहे. संतोष मोहिते गावातच बिअर बार चालवतो, अशी माहिती पुढे आली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळले

हिंगणघाटमध्ये  भयानक घडली. सकाळी साडे सात वाजता भर चौकात एका शिक्षिकेला पेटवून देण्यात आले. हे भयानक कृत्य विकेश नगराळे हा विवाहित असून तो एका मुलाचा बाप आहे. ती शिक्षिका कुठून येणार, हे विकेशला माहीत होतं. विकेश हा त्या तरुणीच्या गावातलाच आहे. तो एका हातात पेट्रोलचा डबा आणि एका हातात जळती काठी घेऊन उभा होता. ती येताच त्यानं तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं. त्यामध्ये ती ३० टक्क्यांवर जळली. तिची प्रकृती प्रचंड चिंताजनक आहे.