मुंबई शेअर बाजारात आज मोठ्याप्रमाणात चढ-उतार

मुंबई शेअर बाजारात आज मोठ्याप्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 21, 2018, 05:34 PM IST
 मुंबई शेअर बाजारात आज मोठ्याप्रमाणात चढ-उतार  title=

मुंबई : मुंबई शेअर बाजारात आज मोठ्याप्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला. मोठी पडझड पाहायला मिळाली. त्यामुळे सेन्सेक्स तब्बल एक हजार अंकांनी पडल्याने एकच खळबळ उडाली. जागतिक बाजारात सर्वत्र पडझड दिसत असून त्याचे परिणाम मुंबई शेअर बाजारावरही झालेले आहेत. शेअर बाजारात अचानक विक्रीचे प्रमाण लक्षणीय पद्धतीने वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सचे दिवाळे निघाल्याचे  चित्र पाहायला मिळाले.

शुक्रवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला. काही बँका आणि गृहनिर्माण कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे सेन्सेक्सने 1100 पेक्षा जास्त अंकांनी पडला. मार्केट बंद झाले त्यावेळी सेन्सेक्स 279.62 अंकांवह होता. आजसेन्सेक्स 36841.60 अंकांवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी  91.25 अंकांनी घसरुन 11143.10 अंकांवर बंद झाला. तज्ञांच्या मते, क्रूड ऑइलच्या वाढत्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयातील कमजोरपणा आणि जागतिक शेअर बाजारातील घसरण यामुळे शेअर मार्केटमध्ये ही स्थिती पाहायला मिळत आहे. 

येस बँक, इंडियाबुल्स हाऊसिंग, यूपीएल, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट्स, सन फार्मा आणि टाटा स्टीलचे शेअर्स आज जोरदार आपटलेत. तर दुसरीकडे भारती इंफ्राटेल, आईओसी, एनटीपीसी, आईटीसी, बीपीसीएल, रिलायंस इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि आयसीआयसीआय यांचे शेअर्स तेजीत होते.