Mumbai Water: 27 फेब्रुवारीपासून मुंबईत 10% पाणी कपात, 'या' भागांना बसणार फटका

Mumbai Water: पाली हिल जलाशयातील जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. बीएमसीच्या जल विभागाची दुरुस्ती आणि पुनर्वसन केलं जातंय. त्यामुळे या भागात पाणीपुरवठा कमी होईल आणि 10 टक्के पाणी कपात होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 23, 2024, 08:25 AM IST
Mumbai Water: 27 फेब्रुवारीपासून मुंबईत 10% पाणी कपात, 'या' भागांना बसणार फटका title=

Mumbai Water: मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणी जपून वापरावं लागणार आहे. याचं कारण म्हणजे मुंबईकरांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचं संकटं ओढावलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने २७ फेब्रुवारी ते सोमवार, ११ मार्च या कालावधीत वांद्रे आणि खार पश्चिम (एच-पश्चिम वॉर्ड) मधील काही भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याची माहिती दिली आहे. 

पाली हिल जलाशयातील जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. बीएमसीच्या जल विभागाची दुरुस्ती आणि पुनर्वसन केलं जातंय. त्यामुळे या भागात पाणीपुरवठा कमी होईल आणि 10 टक्के पाणी कपात होणार आहे. यानंतर सोमवार 11 मार्चनंतर एच-पश्चिम वॉर्डातील या भागात संपूर्ण पाणीपुरवठा सुरू होणार आहे.

BMC पाली हिल जलाशयात 600 मिमी व्यासाची कॅप सेट करत असल्याने या महिन्यात एच-पश्चिम वॉर्डातील पाणीपुरवठ्यावर 16 ते 21 फेब्रुवारीपर्यंत परिणाम झाल्याचं पहायला मिळालं. दरम्यान, मलबार हिल जलाशयाच्या संरचनात्मक स्थिरतेबाबत BMC अजूनही IIT अहवाल प्रलंबित आहे. या समितीचे 3 सदस्य मलाबार हिलचे निवासी आहेत. यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा अहवाल सादर केला आहे. 18 डिसेंबर 2023 रोजी पूर्ण झालेल्या तपासणीनंतर एका महिन्यात अहवाल प्राप्त होणे अपेक्षित होते.

दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा करणारे 143 वर्षे जुनं जलाशय पाडून त्याची पुनर्बांधणी करण्याची योजना बीएमसीने आखली होती. याशिवाय शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने येत्या काही दिवसांत बीएमसी मुंबईत पाणीकपात जाहीर करू शकते. अहवालानुसार, या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा सुमारे 49 टक्के होता. गेल्या 3 वर्षांतील हा सर्वात कमी पाणीसाठा असल्याची नोंदही करण्यात आली आहे.