पाणी जपून वापरा! नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद; गुरुवारी कमी दाबाने पाणी

Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे त्वरित पाणी भरुन ठेवा. 

नेहा चौधरी | Updated: Mar 27, 2024, 10:19 AM IST
पाणी जपून वापरा! नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद; गुरुवारी कमी दाबाने पाणी title=
Water supply stopped in Kamothe Kharghar along with Navi Mumbai today Low pressure water on Thursday

Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईसह कामोठे आणि खारघरमधील घरांमधील नळाचं पाणी गायब होणार आहे. कारण या भागातील पाणीपुरवठा बुधवारी सकाळी 10 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मोरबे धरणाच्या जवळील भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर दुरुस्तीचं काम करण्यासाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे. हे काम करण्यासाठी तब्बल 10 तास लागणार आहे. यामुळे संपूर्ण नवी मुंबईसह खारघर आणि कामोठे भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर गुरुवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी नागरिकांना पाण्याचा जपून वापर असं आवाहन केलंय. (Water supply stopped in Kamothe Kharghar along with Navi Mumbai today Low pressure water on Thursday)

नवी मुंबईकरांना मोरबे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मार्च महिना संपल्यात जमा आहे, एप्रिल महिन्याला सुरुवात असात मोरबे धरणातील पाणी साठा पाहता 49 टक्के एवढा आहे. मोरबे धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून व्यवस्था पाहिली जाते. भविष्यात शहरातील नागरिकांना सुरळीत आणि सुव्यवस्थिपणे पाणीपुरवठा झाला पाहिजे यासाठी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व बसवण्याचं काम नवी मुंबई महापालिका जलविभागाने हाती घेतला आहे. त्यामुळे नवी मुंबई, खारघर आणि कामोठेमधील परिसरावर याचा परिणाम होणार आहे. हे काम तब्बल 10 तास चालणार आहे, असं सांगितलं जातंय. 

या खारघर तसंच कामोठे भागातही सिडको नोडसाठी मोरबे धरणातून पाणीपुरवठा होतो जो जवळपास 50 एमएलडी एवढा असतो. मोरबे धरणामुळे संपूर्ण नवी मुंबईसह इतर शहरांना उन्हाळ्यातही पाणी टंचाईची गंभीर समस्येचे टेन्शन नसतं. मात्र जलविभागाने काम हातात घेतल्यामुळे भर उन्हाळात नवी मुंबईसह खारघर आणि कामोठामधील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. बुधवार आणि गुरुवार नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचे आवाहान नवी मुंबई महापालिकेने केलंय.