मुंबई : स्वबळावर सत्ता आणण्याची तसंच पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. तर दुसरीकडं अजूनही भाजप-शिवसेना युती होईल, अशी आशा भाजपच्या मंत्र्यांना वाटतेय. महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा ऑफर दिली आहे. दोघं मिळून 2019 सालचा मुख्यमंत्री ठरवूया, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजप-शिवसेनेनं वेगळा मुख्यमंत्री ठरवला तर मतांचं विभाजन होऊन काँग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा होऊ नये, अशी आमची इच्छा असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री आमचाच असेल असं म्हणायचं असतं. 2019 साली भाजपचाच मुख्यमंत्री असेल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.
निवडणुकीला उशीर आहे. आता युतीची कोणतीही घाई नाही. योग्यवेळी योग्य विचार करून निर्णय होतील. पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार दिसणार नाही. सरकार येईल ते युतीचं आणि जनतेचं काम करणारं येईल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.