मुंबई : पश्चिम रेल्वेवर सहा लोकलच्या फेऱ्या सोमवारपासून वाढविण्यात येणार आहेत. यात दोन फेऱ्या या 'महिला विशेष' असणार आहेत. सध्या ५०० लोकलच्या फेऱ्या सुरू आहेत, त्यावाढून ५०६ फेऱ्या होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि राज्य शासनाने मान्यता दिलेले कर्मचारी यांनाच लोकलने सध्या प्रवास करता येत आहे.
मुंबईत पश्चिम रेल्वेवर सहा लोकलच्या फेऱ्या सोमवारपासून वाढणार । यात दोन फेऱ्या या 'महिला विशेष' असणार । सध्या ५०० लोकलच्या फेऱ्या सुरू आहेत, त्यावाढून ५०६ फेऱ्या होणार #Mumbai #MumbaiLocal @WesternRly @ashish_jadhao https://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/IRXAz1l6ze
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 26, 2020
लोकलमधून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्यामध्ये सोमवारपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ५०० लोकल फेऱ्या होत होत्या. यात आणखी ६ फेऱ्या वाढवण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
For Ladies essential staff..
SIX ADDITIONAL ESSENTIAL SERVICES INCLUDING TWO LADIES SPECIAL WEF 28.09.2020 @Central_Railway @Gmwrly @PiyushGoyalOffc @RailwaySeva @RailMinIndia pic.twitter.com/ocRSgiWO1h— DRM WR MumbaiCentral (@drmbct) September 26, 2020
पश्चिम रेल्वेवरून अत्यावश्यक सेवेतील दररोज अंदाजे ५० हजार प्रवासी प्रवास करणार होते. ही संख्या ७० हजाच्यापुढे पोहोचली आहे. त्यामुळे गर्दीच्यावेळीत नव्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. महिलांची गर्दी लक्षात घेता दोन महिला विशेष फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.