राष्ट्रपती राजवट लागणार का? राज्याच्या राजकारणातून आताची सर्वात मोठी बातमी

राज्यात महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे

Updated: Dec 28, 2021, 11:41 AM IST
राष्ट्रपती राजवट लागणार का? राज्याच्या राजकारणातून आताची सर्वात मोठी बातमी title=

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीसंदर्भातील नियमात सुधारणा केल्याने राज्यपालांनी आक्षेप घेतला होता, तसेच या नियमांना राज्यपालांनी मंजूरीही दिली नव्हती.

तरी महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक घेणारच असे म्हटले होते. त्यामुळे राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाल्यास राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

घटनातज्ज्ञांनी महाविकास आघाडीला दिलेल्या सल्ल्यात राष्ट्रपती राजवटीची भीती व्यक्त करण्यात आली आहे. परंतू महाविकासआघाडीचे नेते अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत होती. 

राज्यपालांची अनुमती नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक घटनेला धरून नसल्याचे विरोधकांनी म्हटले होते. त्यामुळे अखेर अध्यक्षपदाची निवडणुक होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.