मुंबई : Zeel-Sony Merger : झी एंटरटेनमेंट-सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया हे एकत्र आल्याची घोषणा करण्यात आली आहे. ZEEL चे बोर्ड मेंबरने यांच्या एकत्रीकरणाला मंजूरी दिली आहे. दोन्ही नेटवर्क एकत्र आल्यावर पुनीत गोयंका MD-CEO असणार आहेत.
सोनी पिक्चर्स इंटरटेन्मेंट एकत्र आल्यावर 11,605.94 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा विकासासाठी वापर करणार असल्याची माहिती दिली आहे. एकत्र आल्यावर सोनी पिक्चर्सचा शेअर हिस्सा अधिक असणार आहे.
एकत्र आल्यानंतर झी एंटरटेनमेंटकडे 47.07 टक्के भागीदार असणार आहे. तर सोनी पिक्चर्सकडे 52.93 टक्के हिस्सा असणार आहे. एकत्र आल्यावरही कंपनी भारतीय शेअर बाजारात कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
टीव्ही व्यवसाय, डिजिटल मालमत्ता, उत्पादन संचालन आणि दोन्ही कंपन्यांचे कार्यक्रम लायब्ररी देखील एकत्र केले जाईल. ZEEL आणि SPNI दरम्यान एक विशेष नॉन-बाइंडिंग टर्म शीटवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. कराराचे पुढील काम येत्या 90 दिवसात पूर्ण केले जातील. विद्यमान प्रवर्तक कुटुंब Zee ला आपली हिस्सेदारी 4 टक्क्यांवरून 20 टक्के करण्याचा पर्याय असेल. मंडळावरील बहुतेक संचालकांना नामांकित करण्याचा अधिकार सोनी समूहाला असेल.
कंपनीच्या आर्थिक बाबींव्यतिरिक्त बोर्डाने भविष्यातील विस्तार योजनेवरही चर्चा केली आहे. विलीनीकरणामुळे भागधारक आणि भागधारकांच्या हिताचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे मंडळाने म्हटले आहे.