आमिर खानचा 'सत्यमेव जयते' वादात

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा पहिला टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’चा पहिला भाग रविवारी प्रसारित झाला आणि हा शो हिट झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल नेटवर पाहायला मिळाल्या. मात्र, या आनंदाच्या बातम्यावर विरजण टाकण्याचे दुसरी बातमी आली आणि हा शोच आता वादात सापडला आहे.

Updated: May 8, 2012, 10:18 AM IST

www.24taas.com,  मुंबई

 

 

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा पहिला टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’चा पहिला भाग  रविवारी प्रसारित झाला आणि  हा शो हिट झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल नेटवर पाहायला मिळाल्या. मात्र, या आनंदाच्या बातम्यावर विरजण टाकण्याचे दुसरी बातमी आली आणि हा शोच आता वादात सापडला आहे.

 

 

आमिरचे छोट्या पडद्यावरील बहुचर्चित 'सत्यमेव जयते' हा रियालिटी शो  कार्यक्रमाच्या 'सत्यमेव जयते' या शीर्षकगीतासाठी वापरण्यात आलेला कोरस हा आपण दहा वर्षांपूर्वी 'सत्यमेव जयते' याच नावाने बनवलेल्या गीताचाच आहे, असा दावा 'युफोरिया' या बँडने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाचे गाणे टीव्हीवर झळकत होते. पण मी ते ऐकले किंवा पाहिलेही नव्हते. मात्र ज्या वेळेस मी ते गाणे पाहिले तेव्हा मला धक्काच बसल्याचे  'युफोरिया'चे गायक पलाश सेन  यांनी म्हटले आहे.

 

 

२००० साली 'युफोरिया' बँडचा 'फिर धूम' हा दुसरा अल्बम रिलिज झाला होता. त्यात 'सत्यमेव जयते' या नावानेच गाणे होते. आमिरच्या 'सत्यमेव जयते' या शीर्षकगीताचे संगीत संयोजक राम संपद यांनी गाण्याचे शब्द आणि धून बदलली असली, तरी मुख्य कोरस आमच्या गाण्यातील रचनेसारखेच आहे, त्यामुळे मी त्यांना अधिकृत नोटीस पाठवली आहे, असे  पलाश सेन यांनी सांगितले.

 

 

'सत्यमेव जयते'च्या निर्मात्यांनी आमचे हे गाणे वापरण्याआधी एकदा तरी विचारायला हवे होते. मला एकदा जरी विचारले असते तरी मी परवानगी दिली असती, असेही पलाश सेन यांनी म्हटले आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या शीर्षकगीताचे संगीत संयोजक राम संपद यांनी मात्र याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.