ऐश्वर्या-अभिषेकची बेटी 'आराध्या'?

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन प्रेगंट असल्यापासून बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी कोण येणार, बेटी की बेटा? याचीच चर्चा होती. ऐश्वर्याला मुलगी झाल्याची बातमी छोटा बच्चन अभिषेकने ट्विट केल्यानंतर मीडियाला समजली. त्यानंतर लगेच चर्चा सुरू झाली ती नावाची. त्यासाठी अभिषेकने नावे सुचविण्याचे आवाहनही केलं होतं, त्यामुळे बेटीचे नाव काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचीली होती. मात्र, ही उत्सुकता आता संपली आहे. कारण बिग बीच्या नातीचे नाव आहे, आराध्या.

Updated: Mar 14, 2012, 11:58 AM IST

www.24taas.com,  मुंबई

 

 

 

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन प्रेगंट असल्यापासून बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी कोण येणार, बेटी की बेटा? याचीच चर्चा होती. ऐश्वर्याला मुलगी झाल्याची बातमी छोटा बच्चन अभिषेकने ट्विट केल्यानंतर मीडियाला समजली. त्यानंतर लगेच चर्चा सुरू झाली ती नावाची. त्यासाठी अभिषेकने नावे सुचविण्याचे आवाहनही केलं होतं, त्यामुळे बेटीचे नाव काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचीली होती. मात्र, ही उत्सुकता आता संपली आहे. कारण बिग बीच्या नातीचे नाव आहे, आराध्या.

 

 

बच्चन कुटुंबियांमध्ये नवा सदस्य येणार असल्याने खुशीचा माहोल होता. बच्चन कुटुंबिय मीडियापासून चार हात लांब होते. तर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांना मुलगी झाल्यापासूनच ती चर्चेत आहे. तिचे नाव काय असेल यावरुन मागील काही महिन्यापासून बी-टाऊनमध्ये खमंग चर्चा होती. पण आता ही चर्चा थांबण्याची शक्यता आहे, कारण अखेर तिला नाव मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चन कुटुंबातील या नव्या कन्येचे नाव आराध्या बच्चन असे ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

 

 

 
बिग बी नेहमीच आपली व कुटुंबियांशी निगडीत माहिती सोशल नेटवर्कवरुन देतात किंवा प्रतिक्रिया व्यक्त करतात. मात्र त्यांनी ऐश्वर्याचे बाळंतपण व तिला झालेल्या मुलीबाबत माध्यमासह सोशल नेटवर्कवरुन काहीही प्रतिक्रिया दिल्या नव्हत्या. मात्र 'मी दादा होणार' असे टि्वट करीत त्यांनी सर्वप्रथम ऐश्वर्या गरोदर असल्याची माहिती दिली होती. मुंबईत आराध्याचा जन्म  १६ नोव्हेंबर २०११ मध्ये झाला. मात्र, मीडियापासून अंतर राखले. बच्चन कुटुंबियांनी बेटीचा फोटो आणि नाव काय असेल याची माहिती दिलेली नाही. मात्र, एका प्रमुख हिंदी वर्तमानपत्रानुसार बच्चन कुटुंबातील या नव्या कन्येचे नाव आराध्या असण्याची शक्यता आहे.

 

 

बच्चन कुटुंबिय भारतीय संस्कृतीचे पुजक मानले जाते. त्यामुळे  संस्कृती जपण्याच्या पार्श्वभूमिवर नातीचे नाव अमिताभ ठेवतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे अमिताभ, अभिषेक मुलीचे नाव ट्विटच्या माध्यमातून सर्वांना देतात की मीडियाला प्रेस घेऊन सांगतात. मात्र, यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.  नात 'बेटी बी'चे नाव जाहीर करण्यासाठी बिग बी कोणता मार्ग स्वीकारतात, याची उत्सुकता आहे.