'अग्निपथ'चे सॅटेलाईट राईट्स ४१ कोटींना

हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला 'अग्निपथ' सिनेमा रिलीज आधीच चर्चेत आहे. कारण, या सिनेमाचे सॅटेलाईट राईट्स तब्बल ४१ कोटींना विकले गेले आहेत. झी नेटवर्कने हे राईट्स विकत घेतले आहेत.

Updated: Oct 18, 2011, 10:49 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला 'अग्निपथ' सिनेमा रिलीज आधीच चर्चेत आहे. कारण, या सिनेमाचे सॅटेलाईट राईट्स तब्बल ४१ कोटींना विकले गेले आहेत. झी नेटवर्कने हे राईट्स विकत घेतले आहेत.एवढ्या मोठ्या रकमेची बाजी मारणा-या अग्निपथ सिनेमाने एक नवा रेकॉर्ड केला आहे.

बॉलिवूडमध्ये शाहरुख-सलमान-आणि आमीर या खान मंडळींची नेहमीच मक्तेदारी दिसून आली आहे. मात्र, बॉलिवूडच्या या बिग स्टार्सना हृतिक रोशनने मागे टाकलं. हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला अग्निपथ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. हा सिनेमा अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या 'अग्निपथ' सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमामध्ये हृतिक बिग बींची गाजलेली 'विजय दिनानाथ चौहान'ची भूमिका करतोय. त्यामुळे या सिनेमाकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. या सिनेमासह सध्या बॉलिवूडमध्ये शाहरुखचा 'रा-वन', आमीरचा 'धूवा' या बिग बजेट सिनेमाकडूनही सगळ्यांनाच अपेक्षा आहेत. पण,  या सगळ्यांना मागे टाकत सध्या हृतिकच्या 'अग्निपथ' सिनेमाचे सॅटेलाईट राईट्स ४१ कोटी रुपयांना विकले गेले असल्याची चर्चा आहे.हृतिकच्याच क्रिश 2 सिनेमाचे हक्कही ३८ कोटींना विकले गेले असल्याचं बोललं जात आहे. हृतिकनंतर या यादीमध्ये आमीरचा नंबर लागतो. कारण, आमीरच्या धूवा सिनेमाचे सॅटेलाईट राईट्स 40 कोटीला विकले गेले असल्याची चर्चा आहे. आमीर शाहरुखमधली बॉक्सऑफिस स्पर्धा नवी नाही. सॅटेलाइट हक्कांच्या शर्यतीमध्ये आमीरने शाहरुख खानला मागे टाकलं आहे. कारण, शाहरुखच्या 'रा-वन' सिनेमाचे सॅटलाईट हक्क ३५ कोटींला विकले गेले आहेत.मात्र ही यादी इथेच संपत नाही तर सलमानचा 'बॉडिगार्ड' ३३ कोटी, रणबीरचा 'रॉकस्टार' १८ ते २० कोटी, 'जोकर' २३ कोटी, 'एजंट विनोद' २० कोटी, तर 'हिरोईन' सिनेमाचे सॅटेलाईट राईट्स १५ ते १८ कोटींच्या घरात विकले गेले असल्याची चर्चा आहे....या आकडेवारीवरूनच हेच स्पष्ट होतंय की सध्या हृतिक रोशनने अनेक बिग स्टार्सला मागे टाकून एक नवा रेकॉर्ड केलाय....

 

 

Tags: