करण कक्कड हत्या : शीर नसल्याचं स्पष्ट

सिनेनिर्माता करण कक्कडच्या हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण मिळाले आहे. चिपळूण जवळच्या कुंभार्ली घाटातून गोळा केलेल्या मृतदेहाच्या अवशेषांमधील शीर करणचे नसल्याचं स्पष्ट झाले आहे.

Updated: Jun 9, 2012, 04:46 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

सिनेनिर्माता करण कक्कडच्या हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण मिळाले आहे. चिपळूण जवळच्या कुंभार्ली घाटातून गोळा केलेल्या मृतदेहाच्या अवशेषांमधील शीर करणचे नसल्याचं स्पष्ट झाले आहे.

 

डीएनए चाचणीतून ही माहिती समोर आली आहे. आरोपी विजय पालांडेनं किरण कक्कडची हत्या केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते चिपळूनच्या कुंभार्ली घाटात टाकल्याची माहिती चौकशीत समोर आली होती.

 

पोलिसांनी घाटातून मृतदेहाचे काही अवशेष गोळा केले होते. या अवशेषात असलेलं शीर करणचे नसल्याचं डीएनए चाचणीतून स्पष्ट झालयं. पोलिसांनी या प्रकरणी विजयविरोधात आणखी एक म्हणजे तिस-या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

 

दरम्यान, करण कक्कड आणि अरुण टिक्कू यांच्या हत्या प्रकरणात स्टॉक ब्रोकर गौतम व्होराला मुंबईत अटक करण्यात आली आहे. गुन्‍हे शाखेने ही कारवाई केली. या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी विजय पलांडेला लपविल्‍याचा आरोप गौतम व्‍होरावर आहे.

 

विजय पालांडेला पोलीस कोठडीतून पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. विजय पलांडेला अटक करण्यात आली. त्यानंतर लगेचंच पलांडे पोलिसांच्या तावडीतून पळाला. यानंतर त्याने  लोकलने चर्चगेट गाठलं. पलांडेने व्होराला फोनकरून मदतीची मागणी केली. त्यानुसार व्होरा त्याच्या कारने चर्चगेट स्टेशनवर आला आणि त्याला कुलाब्याच्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. पलांडेने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात या सर्व गोष्टी उघड झाल्या आहेत