सनीच्या 'जिस्म'मध्ये 'कमाल' नाही

बिग बॉस -३ मध्ये सहभागी असलेल्या (आणि शिवीगाळ आणि मारामारीमुळे हाकलून दिलेल्या) कमाल राशिद खानला म्हणे सनी लिऑनचा ‘जिस्म-२’ पाहाण्याची अजिबात इच्छा नाही. आणि याचं जे कारण केआरकेने दिलं आहे ते भन्नाटच आहे.

Updated: Jan 24, 2012, 05:12 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

स्वतःला सुपर-डुपर मेगास्टार समजणारा ‘केआरके’ म्हणजेच कमाल राशिद खान हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉस -३ मध्ये सहभागी असलेल्या (आणि शिवीगाळ आणि मारामारीमुळे हाकलून दिलेल्या) कमाल राशिद खानला म्हणे सनी लिऑनचा ‘जिस्म-२’ पाहाण्याची अजिबात इच्छा नाही. आणि याचं जे कारण केआरकेने दिलं आहे ते भन्नाटच आहे. केआरकेचं म्हणणं आहे की मला ‘जिस्म २’मध्ये सनी लिऑनचं शरीर पाहाण्यात काडीचाही रस नाही. कारण, मी तिचं संपूर्ण शरीर यापूर्वी अनेक वेळा पॉर्न फिल्म्समधून मनसोक्त पाहिलेलं आहे. आता बोला...

 

 

“मला नाही वाटत की मला जिस्म-२ पाहाण्याची काही गरज आहे. कारण, यात त्यातल्या सनी लिऑनच्या प्रत्येक अंग प्रत्यंगाला मी याआधीच पॉर्न फिल्म्समधून कित्येक वेळा बघितलं आहे. त्यातले तिचे ‘आह’ ‘ऊह’ ‘ओह’वाले सीन्स तर त्याहूनही जास्तवेळा पाहिले आहेत.” अशी निर्लज्ज मुक्ताफळंही कमाल राशिद खान याने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत उधळली आहेत.

 

 

सनी लिऑन दिसायला खूपच सुंदर आहे आणि आपल्याला ती फार आवडते असं कमाल राशिद खानचं म्हणणं आहे. “पॉर्न स्टार सनी लिऑन ही माझी ‘नेट लव्ह’ आहे तिला नेटवर पाहायला मला खूप आवडतं. आणि तिला नेटवर पाहाण्याची एकही संधी मी सोडत नाही.” अशी निर्लज्ज कबुलीही कमाल राशिद खानने दिली.