सलमानने कतरिनाला मारलं, करीनाने तिला वाचवलं?

एक था टायगर' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सलमान खानने आपल्या एक्स-गर्लफ्रेंड कतरिना कैफला शिवीगाळ करत मारहाण केल्याची बातमी एका मासिकाने प्रसिद्ध केली होती. कतरिना कैफच्या एका जवळील व्यक्तीने मात्र या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे.

Updated: Jul 3, 2012, 03:34 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

'एक था टायगर' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सलमान खानने आपल्या एक्स-गर्लफ्रेंड कतरिना कैफला शिवीगाळ करत मारहाण केल्याची बातमी एका मासिकाने प्रसिद्ध केली होती. कतरिना कैफच्या एका जवळील व्यक्तीने मात्र या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे.

 

एका मासिकात छापून आलेल्या बातमीनुसार एक था टायगरच्या शुटिंगदरम्यान कतरिनाने घातलेल्या अति तंग कपड्यांवर सलमान खानने आक्षेप घेतला. तिला शिवीगाळ केला आणि काठीने मारलंदेखील. यावर कतरिनाने जवळच शुटिंग करत असलेल्या करिना कपूरला बोलावून घेतलं आणि सलमान खानची जवळची मैत्रीण असणाऱ्या करीनाने सलमानला शांत केलं.

 

मात्र, कतरिनाच्या जवळच्या व्यक्तीने मात्र या बातमीत काहीच तथ्य नसल्याचं सांगितलं. कतरिना आणि सलमानमध्ये चांगले संबंध असल्यामुळेच ते एकमेकांबरोबर काम करत आहेत. कतरिना ही सलमान खानच्या कुटुंबातीलच एक बनली असून सलमान कधीच तिच्यावर हात उगारणार नाही, असं ती व्यक्ती म्हणाली.

 

करिना कपूर जवळच्याच स्टुडिओत शुटिंग करत होती. सलमान- कतरिना शेजारच्या स्टुडिओत आहेत, हे कळल्यावर ती आपल्या या जवळच्या मित्रांना भेटायला आली होती, इतकंच! कतरिना आणि सलमान खान यांच्यातलं बोलणं बंद व्हॅनिटी व्हॅनमध्ये झालेलं. मग सलमान कतरिनाला मारलं किंवा शिवीगाळ केला हे मासिकाला कसं कळलं, असा सवाल मासिकाला केलाय.