जावेद अख्तर होते पक्के दारुडे

मी १९ व्या वर्षापासूनच म्हणजे मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासून दारु प्यायला लागलो होतो. हळू -हळू ही सवय इतकी होत गेली की मी रोज एक बाटलीची दारु संपवू लागलो होतो, असे स्वतः बॉलीवूडमधील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कबुली दिली. तब्बल २६-२७ वर्षापर्यंत पक्का दारुडा होतो, असेही त्यांनी आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात मान्य केले.

Updated: Jul 1, 2012, 06:57 PM IST

www.24taas.com, मुंबई

मी १९ व्या वर्षापासूनच म्हणजे मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासून दारु प्यायला लागलो होतो. हळू -हळू ही सवय इतकी होत गेली की मी रोज एक बाटलीची दारु संपवू लागलो होतो, असे स्वतः बॉलीवूडमधील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कबुली दिली.  तब्बल २६-२७ वर्षापर्यंत पक्का दारुडा होतो, असेही त्यांनी आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात मान्य केले.

.
आमिर खान याने आज प्रसारित झालेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात दारू पिण्याचे दुष्परिणाम आणि त्यामुळे अनेकांना किती यातना सहन कराव्या लागल्यात यावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी अनेक केस स्टडी सादर केल्यात. त्यावेळी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनाही बोलावले होते.

दारु पिल्यानंतर माणसाचे तीन रुपे समोर येतात. घृणास्पद, मूर्ख आणि घाणेरडा. मुर्ख यासाठी की दारु पिल्यानंतर माणूस एकच गोष्ट परत परत करतो. दारुची सवय अशी आहे की, दारु पिणारा हळू-हळू आपला कोटा वाढवत जातो. दारूमध्येच असे काही असते. आपण आजपासून दूध प्यायला लागलो, तर अकरा वर्षांनंतर ११ ग्लास दूध पिणार नाही. पण दारूच्या बाबतीत हे होते, असे अख्तर यांनी सांगितले.

लोक मला हुशार म्हणतात. पण जर मी हुशार होतो तर मला दारू सोडण्याला आणि दारु वाईट आहे, हे समजायला २७ वर्षापर्यंत वाट का पाहावी लागली? अशी प्रांजळ कबुली दिली. मी आयुष्यातील सर्व चुका या दारु पिल्यानंतरच केल्या आहेत. गेल्या २१ वर्षापासून मी दारु सोडली आहे. मी लोकांना एकच सल्ला देईन की दारू पिऊ नका, असेही अख्तर यांनी सांगितले.