सारेगमपचं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. आणि मुख्य म्हणजे हे पर्व असणार आहे सेलिब्रिटी गायकांचं. तब्बल १२ दिग्गज कलाकार आपलं गायनकौशल्य दाखवणार आहेत.
विशेष म्हणजे यंदाचं हे पर्व असणार आहे सेलिब्रिटी गायकांच. मोहन जोशी, प्रशांत दामले, अमृता सुभाष, क्रांती रेडकर, वैभव मांगले, गिरीजा ओक, सतीश तारे, केतकी थत्ते असे तब्बल १२ गायक सारेगमपच्या मंचावर त्यांच्या गाण्याचं कसब दाखवणार आहेत.
तसंच यावेळी सारेगमपच्या आणखी सरप्राईज प्रेक्षकांना मिळणार आहे.. या पर्वात अवधूत गुप्तेसोबत परीक्षकांच्या खुर्चीत बसणार आहेत वंदना गुप्ते. तेव्हा १२ कलाकारांची ही मांदियाळी आणि त्याला मिळालेली दोन जबरदस्त परीक्षकांची जोड यामुळे हे पर्व प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल असं म्हणायला हरकत नाही.