दिल्लीत ओबीसींच्या आरक्षणात वाढ

दिल्ली सरकारने ओबीसींच्या आरक्षणात वाढ केली आहे. पूर्वी ओबीसींसाठी २१ टक्के आरक्षण होते. आता १२ टक्के वाढ केल्याने ते २७ टक्के झाले आहे. या आरक्षणाचा लाभ ओबीसी विद्यार्थ्यांना होणार आहे.

Updated: Feb 28, 2012, 08:05 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

दिल्ली सरकारने ओबीसींच्या आरक्षणात वाढ केली आहे. पूर्वी ओबीसींसाठी २१ टक्के आरक्षण होते. आता १२ टक्के वाढ केल्याने ते २७ टक्के झाले आहे. या आरक्षणाचा लाभ ओबीसी विद्यार्थ्यांना होणार आहे.

 

 

दिल्ली सरकारने उच्च शिक्षणातील ओबीसींच्या आरक्षणात वाढ  करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  घेण्यात आला. येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षणात ओबीसींना २१ टक्‍क्‍यांऐवजी २७ टक्के आरक्षण मिळणार आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री शीला दीक्षित  यांनी दिली.  सरकारने ओबीसींना २७टक्के आरक्षण देण्याचे आश्‍वासन पूर्ण केले आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागात अनेक गरजू विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ होईल, असे शीला दीक्षित यांनी सागितले.

 

 

ओबीसींच्या आरक्षणाबाबतचा निर्णय २००८ मध्येच घेण्यात आला. परंतु त्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आणि एकूण जागांची संख्या वाढवणे गरजेचे होते. त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी आता होत आहे. ओबीसी  आरक्षणात एकूण जागांमध्ये १२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून अनुसूचित जातीजमातीच्या आरक्षणाला नव्या आरक्षणामुळे कोणताही धोका पोहोचणार नाही, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे.