लोकपाल पटलावर, गोंधळात संसद ठप्प

बहुचर्चित लोकपाल विधेयकाच्या स्थायी समितीचा मसुदा आज अखेर राज्यसभेच्या पटलावर ठेवण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मनू सिंघवी यांनी हा मसुदा मांड

Updated: Dec 9, 2011, 08:02 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

बहुचर्चित लोकपाल विधेयकाच्या स्थायी समितीचा मसुदा आज अखेर राज्यसभेच्या पटलावर ठेवण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मनू सिंघवी यांनी हा मसुदा मांडला. मात्र मसुद्याला विरोध दर्शवत विरोधकांनी गोंधळ घातल्यानं राज्यसभेच कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

 

 

पंतप्रधान आणि तृतीय श्रेणीतल्या तब्बल ५७ लाख शासकीय कर्मचा-यांचा लोकपालच्या कार्यकक्षेत समावेश करण्याची मागणी केली. लोकपालच्या मसुद्यावर यापूर्वीच स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

 

 

३० पैकी १६सदस्यांनी पंतप्रधान आणि तृतीय श्रेणीच्या कर्मचा-यांच्या समावेशाची मागणी केलीय. विशेष म्हणजे यात काँग्रेसच्या तीन सदस्यांचाही समावेश आहे. त्यामुळं विरोधकांच्या मागणीला आणखीच बळ मिळालय. या मसुद्यावर१९ डिसेंबरला चर्चा होण्याची शक्यता आहे.