‘अबू अन्सारी माझा मुलगा नाहीच’

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातला दहशतवादी अबू अन्सारी हा आपला मुलगा नाहीच, असा दावा जबीउद्दीन अन्सारीच्या आई रेहाना बेगम यांनी केलाय.

Updated: Jun 28, 2012, 01:39 PM IST

www.24taas.com, बीड

२६/११  च्या मुंबई हल्ल्यातला दहशतवादी अबू अन्सारी हा आपला मुलगा नाहीच, असा दावा जबीउद्दीन अन्सारीच्या आई रेहाना बेगम यांनी केलाय.

मूळचा बीडचा जबीउद्दीन अन्सारीच आता अबू जिंदाल, अबू हामजा या नावानं दहशतवादी कारवाया करत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी हा खुलासा केलाय. अबू हामजा आणि अबू जिंदाल म्हणजे जबीउद्दीन नव्हे, असा दावा जबीउद्दीनची आई रेहाना बेगम यांनी केलाय. तसंच आपली डीएनए चाचणी झालेली नाही, असा दावाही त्यांनी केलाय. पोलिसांनी पकडलेला अबू जिंदाल वेगळाच आहे, तो आपला मुलगा नाही, असा बेगम यांचा दावा आहे.

.