सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्फोट, २ ठार

नांदेडपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय क्रमांक -३ मध्ये रविवारी झालेल्या स्फोटात दोन जण ठार तर ६ जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.

Updated: Dec 25, 2011, 06:33 PM IST

झी २४ तास वेब टीम, नांदेड

नांदेडपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय क्रमांक -३ मध्ये रविवारी झालेल्या स्फोटात दोन जण ठार तर ६ जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.

सीआरपीएफच्या सेवेत असलेल्या तसेच नवीन भरती झालेल्या जवानांना विविध प्रशिक्षणासोबतच स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण येथे देण्यात येत असते.

या स्फोटामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्रशिक्षणादरम्यान हा स्फोट झाला असल्याचे समजते. या स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्फोटातील जखमींवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

सीआरपीएफचे देशभरात तीन केंद्रीय प्रशिक्षण केंद्रांपैकी एक मुदखेड येथे आहे.  ४०० एकर परिसरात हे प्रशिक्षण केंद्र विस्तारलेले आहे.

[jwplayer mediaid="18406"]