नालासोपारामध्ये ७० ते ८० रिक्षांची तोडफोड

नालासोपारामध्ये ७० ते ८० रिक्षांची आणि ७ ते ८ टेम्पो फोडल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री आयोळे परिसरात ही घटना घडली. अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही तोडफोड केली.

Updated: Dec 4, 2011, 05:56 AM IST

झी २४ तास वेब टीम, नालासोपारा

 

नालासोपारामध्ये ७० ते ८० रिक्षांची आणि ७ ते ८ टेम्पो फोडल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री आयोळे परिसरात ही घटना घडली. अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही तोडफोड केली. या तोडफोडीमुळे आयोळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

 

काल  रात्री अज्ञात हल्लेखोरांनी नालासोपारामध्ये आपली दहशत पसरवण्यासाठी काही समाजकंटकांनी नालासोपारामध्ये जवळजवळ ७० ते ८० रिक्षाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या हल्लेखोरांचा अजूनही काहीच थांगपत्ता लागलेला नाही, त्याचप्रमाणे या हल्ल्याप्रकरणी कोणत्याच प्रकारची कारवाई पोलिसांनी केली नाही, किंवा गुन्हा देखील दाखल केला नाही