मनसेची साथ, NCPचा महापौरपदाचा घास?

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं महापौरपदाचा ताबा घेतला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर साळवी महापौरांच्या खुर्चीत बसले. तर हनुमंत जगदाळे यांची सभागृह नेतेपदी निवड केली आहे.

Updated: Mar 19, 2012, 05:49 PM IST

www.24taas.com, ठाणे

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं महापौरपदाचा ताबा घेतला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर साळवी महापौरांच्या खुर्चीत बसले. तर हनुमंत जगदाळे यांची सभागृह नेतेपदी निवड केली आहे.

आज स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात येणार होती. मात्र कोकण भवनातून संख्याबळ आलं नसल्यानं महापौरांनी महासभा तहकूब करत स्थायीची निवडणूक पुढे ढकलली. त्यानंतर युतीचे नगरसेवक सभागृहातून निघून गेले. त्यानंतर आघाडीच्या नगरसेवकांनी ठाणे महापालिका सचिव छाया मानकर यांना सभागृहात बोलवून सभा सुरू केली. सध्या सभागृहात आघाडी आणि मनसेचे नगरसेवक उपस्थित आहेत.

ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेत गोंधळ झाला आहे. कुठल्याच पक्षाचं संख्याबळ माहीत नसल्य़ानं सभागृह तहकूब कऱण्याची वेळ आली आहे. सध्या महापौर आणि युतीचे नगरसेवक निघून गेले पण सभा सुरूच आहे. आघाडीच्या नगरसेवकांनी ठाणे महापालिका सचिव छाया मानकर यांना सभागृहात बोलवून सभा सुरू केली. सध्या सभागृहात आघाडी आणि मनसेचे नगरसेवक उपस्थित आहेत.